1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 जून 2023 (08:53 IST)

कोल्हापूर : बाळ वाचल्याने मुस्लिम कुटुंबाने मुलीचे नाव ठेवले ‘दुवा

baby
कोल्हापूर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून मिळालेल्या मदतीमुळे कागल तालुक्यातील एका मुस्लिम कुटुंबातील नवजात मुलीचे प्राण वाचले. मुख्यमंत्री महोदयाच्या आशीर्वादा मुळे आपल्या मुलीचे प्राण वाचले म्हणून मकुभाई कुटुंबाने तिचे ‘दुवा’ हे नाव ठेवले.

13 जून रोजी तपोवन मैदानावर ‘शासन आपल्या दारी‘ या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्यानंतर थोड्याच वेळात कागल तालुक्यातील सादिक गुलाब मकुभाई व फरीन सादिक मकुभाई या जोडप्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आभाराचे पत्र द्यायचे आहे, अशी उद्घोषणा सूत्रसंचालकाकडून करण्यात आली.
 
मकुभाई कुटुंबीयांना कन्यारत्न प्राप्त झाले. परंतु…
मुलीला दूध पचन होत नसल्याने रुग्णालयातील काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेले होते. 26 दिवसाचं ते चिमुकले बाळ… परिस्थिती खूपच गंभीर झालेली होती. हे कुटुंब अत्यंत गरीब असे होते व मोठा वैद्यकीय खर्च करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर अत्यंत कठीण प्रसंग ओढवलेला होता. त्यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष या कुटुंबाच्या मदतीसाठी अत्यंत तत्परतेने धावून आला व आवश्यक असलेल्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून त्याचा सर्व खर्च या कक्षामार्फत उचलण्यात आला.
 
सर्व अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने या मुलीची तब्येत सुधारून दूध पचनाची समस्या दूर झाली. वैद्यकीय कक्षातून देण्यात आलेल्या तत्पर सेवेमुळे मकुभाई कुटुंबीयांच्या मुलीचे प्राण वाचले….. तिला जीवनदान मिळाले. या कुटुंबाच्या जीवनात आनंद व उत्साहाला पारावर राहिला नाही. या मुलीला मिळालेले जीवनदानामुळे त्यांच्या जीवनात नवचैतन्य संचारले.
 
त्याबद्दल या कुटुंबीयांना मुख्यमंत्री महोदय कोल्हापूर जिल्हा द्रौयावर आले असताना त्यांची भेट घ्यावयाची होती व त्यांनी दिलेल्या दूवामुळे (आशिर्वाद) आपल्या नवजात मुलीचे प्राण वाचले याबद्दल आभार पत्र द्यावयाचे होते. त्यासाठी ते व्यासपीठावर येऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना या जोडप्याने आभाराचे पत्र दिले व मुख्यमंत्री महोदयांच्या दुवा मुळे या मुलीला जीवनदान मिळाले म्हणून या मुलीचे नाव या जोडप्याने ठदुवाठ असेच ठेवले आहे…असे सर्व सूत्रसंचालकाकडून सांगण्यात येत असताना तपोवन मैदानावरील 35 ते 40 हजार लाभार्थी अत्यंत शांततेने हे सर्व ऐकत होते हा सर्व प्रसंग डोळ्यात साठवून ठेवत होते हा एक अत्यंत भावनिक व संवेदनशील प्रसंग व्यासपीठावर घडत होता. या संवेदनशील प्रसंगातून राज्याचे राज्यप्रमुख, पालक, कुटूब प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किती संवेदनशील आहेत, याची कल्पना येथील उपस्थित सर्व लाभार्थ्यासह ऑनलाइन द्वारे हा कार्यक्रम पाहणारे राज्य व देशभरातील सर्व नागरिकांना आलीच असेल.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जोडप्याला नाराज न करता ठदुवाठ या मुलीला जवळ घेतले. दुवाच्या तब्येतीचे कुटुंबाकडे अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी केली. सादिक मकुभाई यांनी दिलेले आभाराचे पत्र ही अत्यंत नम्रपणे स्वीकारले. त्यांनी दुवा हिला उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व पालकमंत्री दीपक केसरकर यांनाही दाखवले. त्या मुलीला दाखवत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या चेह्रयावरील समाधान ही आपण एक राज्याचे राज्यप्रमुख म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावत असून आपल्या राज्यातील सामान्यतील सामान्य नागरिक ही शासकीय योजनांच्या मदतीतून समाधानी झाला पाहिजे याचे द्योतकच होते.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor