डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाच्या उंचीवरून आता वाद सुरु
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या उंचीवरून जोरदार वाद झाला होता. आता असाच वाद देशाचे संविधान करते बहुजनाचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्यावरून जोरदार वाद सुरु झाला आहे. इंदू मीलमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्मारकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बाबत चे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची उंची 350 फूट ठेवण्याची होती मात्र नवीन आराखड्यानुसार पुतळ्याची उंची 251 फुट, तर खालचा चौथरा 99 फूट होणार असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बहुजन आंबेडकरी समाजात याप्रकरणी मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. याआधी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातूनही बाबासाहेबांचे भव्यदिव्य स्मारक असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. स्मारकाच्या आढावा बैठकीत सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी याप्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे मोठा उद्भवण्याची शक्यता आहे. सरकार यावर काय भूमिका घेतं आणि काय निर्णय देतं याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. मात्र राज ठाकरे यांनी दोन्ही पुतळ्यांना विरोध दर्शवला असून छत्रपती शिवाजी राजे यांचे सर्व किल्ले दुरुस्त करा आणि डॉ. आंबेडकर यांच्या नावाने जगप्रसिद्ध ब्रिटीश लायब्ररी सारखी निर्माण करा हेच खरे स्मारक असेल असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.