बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (14:35 IST)

मोदी सरकार म्हणजे लुटारूंची कंपनी : राहुल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार म्हणजे लुटारूंची कंपनी आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. 
 
राफेल कराराचा संदर्भ देत राहुल यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. या संदर्भातली एक कविताच त्यांनी त्यांच्या अधिकृत टि्वटर हँडलवर पोस्ट केली आहे. मोदी अंबानी का देखो खेल, ' एचएएल से छीन लिया राफेल' अशी या कवितेची सुरूवात आहे. आपण सगळे मिळून लुटारूंची कंपनी थांबवू, असे आवाहनही त्यांनी केले आहे.