गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (16:53 IST)

शिवसेना प्रमुखांची संपत्तीचा वाद मिटला, हे ठाकरे झाले खरे वारस

राज्यातील आणि देशातील सर्वात मोठा राजकारणी, लोकांचा नेता असलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून जयदेव ठाकरे त्यांचे बंधू शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाद निर्माण झाला होता. हा संपूर्ण वाद मुंबई हायकोर्टातही गेला. पुत्र जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रातील मजकुराबद्दल काहीतरी गफलत असून त्यात संशय व्यक्त केला. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणात जयदेव ठाकरे यांनी मात्र अचानक दावा मागे घेतला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीची मालकी उद्धव ठाकरेंना मिळाली असून,  खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नसल्याचं जयदेव ठाकरे स्पष्ट करत, याचिका मागे घेतली आहे. 
 
बाळासाहेब ठाकरेंचे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झाले. उद्धव यांनी उच्च न्यायालयात त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्यासाठी अर्ज केला. त्यावर जयदेव यांनी आक्षेप घेतला होता. याबाबत कायदेशीर वाद सुरू झाला होता. मृत्यूपत्र तयार करताना बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली होती. त्यांची दिशाभूल करून हे मृत्यूपत्र तयार करण्यात आले असा दावा केला होता. मृत्यूपत्र प्रामणित करून घेण्यासाठी उद्धव हे न्यायालयात अर्ज करू शकत नाही, असा दावा जयदेव यांनी केला मात्र अचानक मृत्युपत्राला आव्हान देणारी याचिका मागे घेत जयदेव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती उद्धव ठाकरेंना मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. त्यामुळे शिवसेना जसे उद्धव वारस होते तसे आता मातोश्रीचे सुद्धा उद्धव वारस असणार आहे.