शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (12:30 IST)

पती कोमात असल्यास पत्नी बँक खाते चालवू शकते

नवी मुंबईतील एका महिलेला तिच्या ६३ वर्षीय पतीचे बँक खाते चालविण्याची परवानगी दिली आहे. पती कोमात असल्याने, पत्नीला आधीच खूप मानसिक त्रास झाला आहे. आम्हाला त्यांना आणखी त्रास द्यायचा नााही, असे म्हणत, उच्च न्यायालयाने शु परवानगी दिली.
 
पतीवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने, नवी मुंबईतील एका महिलेने कोमात असलेल्या पतीची ‘पालक’ म्हणून आपली नियुक्ती करून, त्याचे बँक खाते चालविण्याची परवानगी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कोमात असलेल्या रुग्णांच्या अधिकारांबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नसल्याचे तिने याचिकेत म्हटले आहे. न्या. एस. एम. केमकर व न्या. जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.