1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 जून 2021 (16:24 IST)

बीड: कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींसह पुतणीचा नदीत बुडून मृत्यू

बीड: एका धक्कादायक घटनेत कपडे धुण्यासाठी गेलेल्या चौघी जणी नदीत बुडाल्या. यापैकी तिघींचा मृत्यू झाला आहे, तर एकीला वाचवण्यात यश आलं.  मृतांमध्ये आई, मुलगी आणि पुतणीचा समावेश आहे. गेवराई तालुक्यातील मिरगाव इथं ही दुर्दैवी घटना घडली. 
 
रंजना गोडबोले वय 30, शीतल गोडबोले वय 10 आणि अर्चना गोडबोले वय 10, यांचा मृतांत समावेश आहे. तर आरती गोडबोले या मुलीवर उपचार सुरु आहेत.
 
रंजना गोडबोले या त्यांची मुलगी आणि दोन पुतणींसह कपडे धुण्यासाठी गोदावरी नदीवर गेल्या होत्या. या दरम्यान रंजना गोडबोले आणि त्यांच्यासोबत असलेली मुलगी आणि दोन पुतण्या पाण्यात बुडाल्या. या घटनेत पाण्यात बुडून तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आरती गोडबोले या चिमुकलीला वाचवण्यात यश आलं. आरतीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तिघी कशा बुडाल्या याचा तपास करत आहेत. या घटनेमुळे मिरगावात हळहळ व्यक्त होत आहे. 
 
दोन दिवसांच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून आधीच गोदावरी नदीला मुबलक पाणी आहे. या परिस्थितीत प्रशासनाकडून नदी काठी न जाण्याचे आवाहन केलं जात आहे.