बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2023 (20:52 IST)

भाजप नेत्या चित्रा वाघ उर्फी जावेदवर भडकल्या

Chitra Wagh
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध सुरू असून चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला खडसावले आहे. चित्रा वाघ या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी यावेळी संवाद साधला. त्या अभिनेत्री उर्फी जावेदवर प्रचंड संतापल्या असून, उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाही, ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेन असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
 
त्या म्हणाल्या, “आम्ही काय काम करतो, हे ऊर्फी सारख्या बाईला मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्या पद्धतीने नंगानाच सुरू आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अश्या शब्दांत तिला सुनावले आहे. संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या लोकांना हा नंगानाच दिसत नाही का?” असा सवाल त्यानी यावेळी केला आहे.
 
मला तर ही उर्फट बाई कोण आहे, हे माहीतही नाही, एका बाईने मला हे व्हिडिओ पाठवले, तिने मला सांगितलं, मुंबईच्या रस्त्यावर काय चाललंय बघा. हा नंगानाच आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही पोलिसांत तक्रार केलीय. याला अंतिम स्वरूप दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
 
जे ट्रोलर्स आमच्यावर टीका करत आहे, त्यांना हे मान्य आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहे. तुम्ही चॅनलवाले बातम्या करताना का ब्लर दाखवता?, कारण तुम्ही ते दाखवू शकत नाही. मग अशा या उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाही असे खडेबोल त्यांनी सुनावले आहे.
 
ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेन, आणि नंतर तुम्हाला ट्विट करून सांगेन असे चित्रा वाघ यांनी सांगितले, त्या प्रचंड संतापल्या आहेत. त्या म्हणाल्या काय व्हायचं, ते होऊ द्या.

Edited By- Ratnadeep Ranshoor