मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2023 (16:18 IST)

अकोल्यात नायलॉनच्या मांजाने चिरला चिमुकल्याचा गळा

संक्रात जवळ येतातच आकाशात सर्वत्र पतंग काटाकाटी चा खेळ सुरु होतो आणि त्या कटणाऱ्या पतंगांना पकडणारे चिमुकले धावताना दिसतात. पतंगांना उडवण्यासाठी लागणाऱ्या नॉयलॉनच्या मांजांमुळे पक्षांना आणि लोकांना आपला जीव गमवावा लागतो. तरी या नॉयलॉनच्या मांजाचा बंदी घालण्याचा आदेश असून देखील नॉयलॉन मांजाचा सर्रास वापर केला जातो. राज्यात नॉयलॉनच्या मांजाची विक्री आणि त्याचा साठा करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्याचा आदेश काढण्यात आला असून देखील हे आदेश कागदावरच असल्याचे जाणवते. अकोल्यात नॉयलॉनच्या मांजामुळे एका चिमुकल्याचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अकोल्यात आश्रय नगर येथे राहणारा साढेतीन वर्षाचा वीर उजाडे हा चिमुकला आपल्या आईसोबत संध्याकाळी स्कुटीने जात असताना अचानक त्यांच्या स्कुटी समोर कटलेली पतंग गेली आणि पतंगीच्या मांजा चिमुकल्याचा गळयात अडकला आणि त्याचा गळा चिरला केला. या मध्ये त्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याला रक्तबंबाळ झालेलं पाहून आईनं तातडीनं रुग्णालयात नेले. शस्त्रक्रिया करण्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च सांगितलं तातडीने एवढी मोठी रक्कम कुठून जमा करायची हा मोठा प्रश्न या कुटुंबासमोर होता. पण चिमुकल्याचा काहीही करणाऱ्या वडिलांनी पैसे गोळा करून शस्त्रक्रिया साठी दिले. चिमुकल्यावर शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले. 

मात्र नॉयलॉनच्या मांजामुळे दरवर्षी पक्षांना आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात इजा होते. त्यामुळे राज्यात नॉयलॉनचा मांजा विक्री आणि वापर न करण्याचे आदेश दिले असून देखील नॉयलॉनचा मांजा सर्रास विक्री केला जात असल्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 
 
Edited By - Priya Dixit