नागपूरमध्ये एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त
नागपुरात अमरावती रोडवर 1 कोटी 500 रूपयांची कॅश जप्त झाली. नागपूर एसीबीने ही कारवाई केली.याही रकमेत जुन्या नोटा सापडल्या. तर निफाडमध्ये 14 लाखांची रक्कम जप्त झालीये. या रकमेपैकी 9 लाखांची रक्कम 2000 रूपयांच्या नव्या नोटांमध्ये आहे.
नागपुरच्या जी. एच. रायसोनी कॉलेजची एक कोटी रुपयांची रोकड अँटी करप्शन ब्युरोने पकडली आहे. चलनात नसलेल्या जुन्या पाचशे आणि हजारांच्या या नोटा आहेत. रायसोनी कॉलेजचे संचालक सुनील रायसोनी यांना जळगाव हुन प्रितम रायसोनी यांनी ही कॅश पाठवल्याच एसीबीला संशय आहे. नागपुरच्या अमरावती रोडवर गोंडखैरी येथे टोलनाक्यावर एका टाटा एस गाडीतून एक कोटी पाचशे रुपयांची कॅश एसीबीने पकडली होती. ही रोख रक्कम अमरावतीहून नागपूरला नेली जात होती.