शुक्रवारी दुपारी मुंबई आणि उरण दरम्यान झालेल्या जोरदार पावसावेळी बुचर बेटावरील तेलाच्या टाकीवर वीज कोसळली. यानंतर या द्वीपावरील तेलाच्या टाकीला मोठी आग लागली. आकाशात मोठ्या प्रमाणात धुराचे लोण पसरले होते. या धुरामुळेच हा काळा पाऊस झाला असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.