Daily Horoscope
✕

बाप्परे, ‘ड्रेन इन्स्टा’खाल्ल्याने मुलाची अन्ननलिका जळाली

Updated: शनिवार, 28 जानेवारी 2023 (20:31 IST)
 
दुपारी शाळेतून आल्यानंतर भूक लागल्याने साहिल याने गावापासून जवळच असलेल्या एका किराणा दुकानात महिलेला खाऊचे पाकीट मागितले. त्यावेळी त्या महिलेने खाऊच्या पाकिटाऐवजी त्याच्या हातात वाॅश बेशीन स्वच्छ करण्यासाठी वापर करतात ते ‘ड्रेन इन्स्टा’ पाकीट दिले. खाऊचे पाकीट समजून त्याने पाकीट फोडून संपूर्ण पावडर तोंडात टाकली. त्याचवेळी त्याची जीभ चरचरली म्हणून त्याने एक ग्लास पाणी पिले. ॲसिडयुक्त असलेल्या या पावडरमुळे साहिलची अन्ननलिका जळाली. त्याने आरडाओरडा केल्यानंतर त्याचे वडील आणि इतर लोक तेथे आले. त्यांनी साहिलला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. 
 
दोन दिवसांपासून त्याला बोलता येत नसल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. साहिलचे वडील तानाजी पवार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दुकानदार महिलेविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सुनंदा शंकर साबळे (रा. साबळेवाडी, पो. वेण्णानगर, ता. सातारा) या महिलेवर (व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने दुखापत पोहोचवणे) या कलमान्वे गुन्हा दाखल केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सिबिल स्कोर न तपासता शेतकऱ्यांना पीककर्ज द्या; कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यासही बंदी

LIVE: १४ महिलांची फसवणूक करणारा आरोपी मोहम्मद माजिन यूएईतून अटक

१४ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून गंडा घालणारा मोहम्मद माजिन यूएईतून जेरबंद; महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई

राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव; काँग्रेसने ३१ पैकी २१ जागा जिंकल्या

हनीमूनदरम्यान बार्बेक्यूच्या आगीत होरपळलेली नवविवाहित महिला, दोन महिन्यांनंतर मरण पावली

पुढील लेख
Show comments