शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (11:48 IST)

कृष्णकुंज येथे भुजबळ समर्थक करणार अन्याय पे चर्चा

माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांसाठी त्यांचे समर्थक ते तुरुंगातून बाहेर यावे म्हणून प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांनी नेते मंडळी, पदाधिकारी, समर्थक आणि सर्वच क्षेत्रातील लोकांना भेटून भुजबळ यांच्यावर त्यांच्या समर्थकाननुसार  झालेला अन्याय दूर दूर व्हावा याच्या साठी अन्याय पे चर्चा करत आहेत. याचाच एक भाग म्हणून भुजबळ समर्थक मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

या मोहीमेचे स्वरुप आणखी व्यापक करण्याची रणनिती आखण्यात आली असून भुजबळ समर्थ्लृक सोमवारी (दि.5) महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थ्लृान असलेल्या ‘कृष्णकुंज’ येथे जाऊन भुजबळ समर्थ्लृक ‘अन्याय पे चर्चा’ करणार आहेत.

भुजबळ आणि राज ठाकरे यांचे राजकीय शत्रुत्व सर्वाना माहित आहे. नाशिक महापालिकेत असलेली भुजबळ यांची सत्ता राज यांनी उलथून टाकली होती. भाषणात मफलरने भुजबळ यांचा धडा शिकवा असे राज यांनी सांगताच नाशिकच्या नागरिकांनी मनसेला एकहाती सत्ता दिली होती.

भ्रष्टाचार प्रकरणामुळे भुजबळ तुरुंगात आहे. तर, निवडणुकीतील अपयशामुळे राज ठाकरे हे विजनवासात आहे. भुजबळ यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या समर्थक यांच्यात असून राज ठाकरे यांचे जर समर्थन मिळाले तर फायदा होईल या भावनेने समर्थक राज यांना भेटणार आहेत.