1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 (15:58 IST)

नारळाच्या झाडाचे केले डोहाळे जेवण, वाचा कोठे

‘पुणे तिथे काय उणे’ असं नेहमीच म्हटले जाते, पुणेरी पाट्या, पुणेकरांची दुपारची झोप, असे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. मात्र आता चक्क झाडाचे डोहाळे पुरवण्याचा चंग एका महिलेने बांधला असून, तिने नारळाच्या झाडाला नटवून त्याचं डोहाळे जेवण केले आहे. पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या नीता यादवड यांनी आपल्या नारळाच्या झाडाचं डोहाळे जेवण केलं.
 
नीता यादवड यांनी रत्नागिरीतील कोकण कृषी विद्यापीठातून नारळाचं झाड आणले होतं. तर त्याची सावली येत असल्याने त्यांनी झाड दुसऱ्या जागी हलवून त्याचं पुनर्रोपण केले होते. अचानक तीन आठवड्यांपूर्वी नारळाच्या झाडाला तुरा आला. त्याचंच सेलिब्रेशन म्हणून डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा त्यांनी घाट घातिला होता. जसे आपण घरातील गर्भवतीला ज्याप्रमाणे सजवून तिची ओटी भरतो त्या प्रकारे जोरदार तयारी करत नारळाच्या झाडाच्या डोहाळे जेवणासाठी करण्यात आली होती. खणा नारळाची ओटी भरुन, हिरव्या बांगड्यांचा साज चढवत पारंपरिक पद्धतीने डोहाळे जेवण करण्यात आले.