गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 मार्च 2018 (09:20 IST)

मोबाईला हात लावला म्हणून पत्नीला मारहाण

नाशिकमध्ये पतीचा मोबाईल पाहिला म्हणून पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारण्याची घटना घडली आहे. मोबाईल फोनला हात लावला म्हणून राग अनावर होऊन पत्नीला अमानुषपणे मारण्याचा प्रकार घडला आहे. सोशल मीडिया आणि मोबाईलचा अती वापर यामुळे घरगुती हिंसाचाराचे प्रकार वाढत आहे. त्यातीलच हा प्रकार असल्याचा प्रत्यय आला आहे. 

पतीचा मोबाइल पहाणे पत्नीला महागात पडले. मोबाइल पाहिला म्हणून पतीने पत्नीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. अंबडमधील दातीरनगर परिसरात शुक्रवारी हा प्रकार घडला. संबंधित महिलेने अबंड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.