बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 मार्च 2018 (09:15 IST)

मार्चमध्ये परीक्षा झाल्यानंतर शाळेला सुट्टी

मार्चमध्ये परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा घोषणा केली असून आपण अधिकाऱ्यांना बोलावून सूचना देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याआधी मार्चमध्ये परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय होता. शिक्षण विभागाच्या या निर्णयावर पालकांसहित शिक्षकांकडूनही टीका होत होती. अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. हा निर्णय केंद्र सरकारच्या आदेशानंतर घेण्यात आला होता अशी माहिती त्यांनी यावेळी दिली असून आवश्यकता भासली तर पुढील शैक्षणिक वर्षात लागू करु, असंही विनोद तावडेंनी सांगितलं आहे.