मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 28 मार्च 2018 (09:17 IST)

वोडाफोन-आयडियाचे विलीनीकरण मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

वोडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी येथे दिली. या विलीनीकरणास कंपनी राष्ट्रीय  कायदा लवाद (एनसीएलटी) व सेबीने आधीच मान्यता दिली आहे. देशात ५जी मोबाइल सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (कोआई) वतीने येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
 
विलीनीकरणानंतर तयार होणाऱ्या नव्या कंपनीसाठी वोडाफोन व आयडियाने गेल्याच आठवड्यात समितीची घोषणा केली. कुमार मंगलम बिर्ला हे अ-कार्यकारी चेअरमन, तर बालेश शर्मा सीईओ असतील. विलीनीकृत कंपनी ग्राहक आणि महसुलाच्या दृष्टीने भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी ठरणार आहे. जूनअखेरपर्यंत हे विलीनीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.