बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 मार्च 2018 (10:50 IST)

संभाजी भिडे विरोधात पुरावा नाही, भिडे यांना क्लीनचीट

कोरेगाव भीमा प्रकरण अजूनही गाजते आहे. यावर आंबेडकर यांनी आणलेला एल्गार मोर्चा मुळे सरकारला चर्चेस भाग पाडले आहे. मात्र आज मुख्यमंत्री एल्गार परिषदेचा आरोप फेटाळून लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भिडे गुरुजींना 'क्लीन चिट' दिली आहे. त्यामुळे आता सरकार भिडे यांना पाठीशी घालत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत विधानसभेत झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्री-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केलं. त्यावेळी कालचा एल्गार मोर्चा आणि भिडे गुरुजींना अटक करण्याची मागणी, याबाबतही त्यांनी सरकारची बाजू मांडली आहे. 

मुख्यमंत्री निवेदन देतांना म्हटले आहे की संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना दंगल घडवताना पाहिल्याची तक्रार एका महिलेनं केलीय. ती पोलिसांनी नोंदवून घेतली आणि कारवाईही सुरू मात्र, चोकसी नंतर आजपर्यंत जेवढे पुरावे समोर आलेत, त्यात संभाजी भिडे गुरुजींविरोधात एकही सबळ पुरावा सापडलेला नाही. या दंगलीत त्यांचा सहभाग असल्याचं स्पष्ट होत नाही', असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नमूद केल आहे. मात्र भिडे यांची चौकशी बंद केली नसल्याचंही त्यांनी सांगितल आहे.  भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आपल्याकडे एक फेसबुक पोस्ट दिली आहे. भिडे गुरुजींच्या सांगण्यावरूनच दंगल भडकल्याचा दावा त्यांनी या पोस्टच्या आधारे केला आहे. त्या पोस्टचीही चौकशी केली जाईल, असा निर्वाळा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे आता अनेक प्रश्नांना बगल देणारे मुख्यमंत्री पुढे कसे प्रश्नाना सामोरे जातील हे पहाणे उस्तृकेचे आहे.