suvichar
✕

मुंबईच्या डबेवाल्यांचे आता कुरिअरच्या क्षेत्रात पदार्पण

Updated: सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (08:43 IST)

डबेवाल्याने घरातून जेवणाचा डबा घेतल्यानंतर तीन तासांत तो डबा कार्यालयात पोहोचविण्यात येतो. याच धर्तीवर ज्या दिवशी कुरिअर घेतले त्याच दिवशी त्याची डिलीव्हरी करण्यात येणार आहे. ‘डिजिटल इंडिया’शी हातमिळवणी करीत एका कुरिअर कंपनीसाठी डबेवाले काम करणार आहेत. त्यात मोबाइल अ‍ॅपच्या साहाय्याने ही सेवा कार्य करेल. त्या अ‍ॅपच्या आधारे डबेवाल्याचे लोकेशन कंपनीला व ग्राहकांना कळणार आहे. जो डबेवाला जवळ असेल त्याला त्या कुरिअरचे कॉल मिळणार आहेत. या कामी विशाल मेहता हे डबेवाल्यांना सक्रिय मदत करत आहेत. 

लवकरच मान्यवरांच्या हस्ते या अ‍ॅपचे अनावरण होईल. जे डबेवाले कुरिअर क्षेत्रात येत आहेत त्यांना दादर येथे विशेष ट्रेनिंग देण्यात येत आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या आर्थिक लाभातून ५ टक्के रक्कम गरीब, गरजू डबेवाल्यांच्या मुलांना देण्यात येईल. त्याचप्रमाणे, मुंबईचे डबेवाले डिजिटल डबेवाले झाले आहेत. ‘डिजिटल डबावाला’ या वेबसाइटच्या माध्यमातून डबेवाले सात सेवा आॅनलाइन देत आहेत. यामध्ये एकने वाढ करून विवाह नोंदणी प्रमाणपत्रही आता डबेवाले आॅनलाइन काढून देणार आहेत. मल्हार नेचर डॉट कॉमच्या माध्यमातून मुंबईचे डबेवाले मुंबईकरांना शुद्ध, नैसर्गिक भाजी पुरवत आहेत.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: शरद पवार दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करणार

नीता अंबानी यांनी नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय' या प्रकल्पाचे भूमिपूजन केले; ५,००० हून अधिक गरजू मुलांना घरे उपलब्ध होणार

तुरुंगात कट रचला; जामिनावर सुटल्यानंतर एसबीआय बँकेवर टाकला दरोडा! जळगावात चार आरोपींना अटक

सिंहगड किल्ल्यावर फडकणार १०० फूट उंच भव्य भगवा ध्वज! पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

ग्लेन फिलिप्सच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सलग दुसरा टी२० सामना जिंकला

पुढील लेख
Show comments