Dharma Sangrah
✕

कलबुर्गी, दाभोळकर, पानसरे हत्येचा तपास एनआयएतर्फे नाही

Updated: शनिवार, 24 मार्च 2018 (11:48 IST)
 
कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली आहे. उमादेवी यांनी कलबुर्गी, नरेंद्र दाभोळकर, गोविंदराव पानसरे यांच्या हत्येची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्याची मागणी केली आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी अशा प्रकारच्या हत्यांचा तपास एनआयएच्यावतीने करण्याची कायद्यात तरतूद नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासोर ही सुनावणी झाली.
 
यावेळी न्यायालयात सरकारच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरला. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणी सीबीआयसह महाराष्ट्र आणि कर्नाटकसरकारला एक जुलैपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान, विचारवंत नरेंद्र दाभोळकर, गोविंदराव पानसरे आणि कलबुर्गी हत्यांमागे सामायिक मोड्‌स ऑपरेंडी वापरण्यात आल्याचा युक्तिवाद उादेवी यांनी न्यायालयात केला आहे. स्थानिक तपास यंत्रणांना हत्येचा उलगडा करण्यास आप यश न आल्याने उमादेवी यांनी एनआयएच्यावतीने तपास करण्याची मागणी केली होती.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: अजिबात काळजी करू नाका; पंतप्रधान मोदींनी मराठीतून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठे आश्वासन दिले

पंतप्रधान मोदींचा शेतकऱ्यांना दिलासा! मराठीतून म्हणाले, 'अजिबात काळजी करू नका'; महाराष्ट्रासाठी दिले मोठे आश्वासन

दिल्ली-पुणे इंडिगो विमानात मोठी घटना; प्रवाशाने आपत्कालीन दरवाजाशी केली छेडछाड, प्रवाशांमध्ये घबराट, गुन्हा दाखल

गोलकीपरशी धडक झाल्याने स्ट्रायकर जीझस डी मिगेलचा मृत्यू

प्रवाशांनो लक्ष द्या! दिवाळी आणि छठच्या दिवशी दिल्लीसह या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद राहील

पुढील लेख
Show comments