रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2017 (10:19 IST)

शंभर टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफी

शंभर टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ज्यांची आर्थिक उलाढाल दहा लाखांच्या वर आहे किंवा जे शेतीशिवाय अन्य नोकरी-धंदा करतात, त्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले आहे. तसेच शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी १५ जिल्ह्यांमध्ये तब्बल चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाचा दुसरा भाग रविवारी प्रसारित करण्यात आला. या वेळी शेती आणि कर्जमाफीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी विस्ताराने उत्तरे देत आपली भूमिका स्पष्ट केली. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने योजना तयार करण्यात आली आहे. त्यातून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये चार हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.