Dharma Sangrah
✕

शेतकरी संकटात असताना वीजबिलाची सक्तीने वसुली म्हणजे मड्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार - धनंजय मुंडे

Updated: शनिवार, 29 सप्टेंबर 2018 (10:48 IST)
 
मराठवाड्यासह राज्यातील सर्वच भागात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे गेली आहेत. अशावेळी उपलब्ध थोड्याशा शेतातील पाण्यावर पिके जगवण्याची शेतकऱ्यांना शेवटची आशा उरली आहे. 
 
शेतकरी ही पिके जगवण्याचा प्रयत्न करत असतानाच महावितरणने एक पत्रक काढून त्यांच्याकडील कृषी पंपाची, विजेची थकबाकी ३ हजार रूपये, ५ हजार रूपये याप्रमाणे वसुली करण्याचे आदेश काढले असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.
 
महावितरणच्या संचालकांनी १९ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंत्यांना एक पत्र पाठवून शेतकऱ्यांकडील वीजबिलाची वसुली करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. सदर आदेश हे मा. उर्जामंत्र्यांसोबत १८ ऑगस्ट रोजी झालेल्या एका बैठकीनुसार काढण्यात आल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
 
शासनाच्या या सक्तीच्या सावकारी वसुलीबाबत धनंजय मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. दुष्काळ जाहीर करून त्यांना वेगवेगळी मदत देणे आवश्यक असतानाच महावितरण सक्तीने वसुली कशी करू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
 
हजारो, कोट्यावधी रूपये घेऊन उद्योगपती पळून जात असताना ते सरकारला दिसत नाहीत आणि शेतकऱ्यांकडील पाच, दहा हजार रूपयांची वसुली करण्याचेच कसे काय सुचते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
 
शेतकऱ्यांजवळ आज तीन हजार रूपयेच काय एक रूपयाही भरण्यासाठी पैसे नाहीत. मागील काळातील नुकसानीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही, फसवी कर्जमाफी केली, पीक विमा मिळत नाही, महागाईमुळे ही शेतकरी त्रस्त झाला आहे, पिकवलेल्या मालाला हमीभाव मिळत नाही. चारही बाजूंनी शेतकरी संकटात सापडला असताना महावितरणची ही सावकारी, जुलमी वसुली असल्याची टीका करून हे पत्रक तातडीने मागे घ्यावे, शेतकऱ्यांकडील सक्तीची वीजबिल वसुली केवळ थांबवावी नव्हे तर त्यांचे वीजबिल माफ करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

नाशिक सिंहस्थ कुंभादरम्यान दररोज १५० हून अधिक विशेष गाड्या धावणार

LIVE: नाशिक सिंहस्थ कुंभादरम्यान दररोज १५० हून अधिक विशेष गाड्या धावणार

उपमुख्यमंत्री शिंदे विनोद कांबळी यांच्या मदतीसाठी पुढे आले, उपचाराचा संपूर्ण खर्च उचलणार

ACC U19 महिला आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर; भाविका अहिरे कर्णधार

भारतीय संघाने इतिहास रचला, चीनला हरवून विक्रमी चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

पुढील लेख
Show comments