suvichar
✕

धनगर आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला अपघात; दोन ठार

Updated: बुधवार, 13 डिसेंबर 2023 (08:33 IST)
 
तालुक्यातील सरफराजपूर येथून नागपूर येथे होणा-या धनगर आरक्षण मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणा-या वाहनाला माहूर तालुक्यातील वाई बाजारपासून जवळच अवघ्या ३ कि.मी. अंतरावर असलेल्या सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील अंजनखेड जवळील पुलावर पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास स्वीफ्ट डिझायर एम.एच ०२ बी.पी. ९८३६ या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सरफराजपूर (ता. पालम जि. परभणी) येथील चालकासह ५ जण धनगर आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी नागपूर येथे गेले होते.
 
तेथून परतीच्या मार्गावर असताना वाटेत माहुर येथे देवदर्शन घेवून पालमकडे परतत होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण धडकेत डिझायरच्या समोरील बाजूचा अक्षरश: चुराडा होवून यातील रमेश दत्तराव वाघमारे (५५) व लक्ष्मण पंडीत वाघमारे (३७) यांचा जागीच मृत्यू झाला. चालक रंगनाथ संपथराव वाघमारे, राम बालाजी बनसोडे, बापुराव मारोती वाघमारे यांना गंभीर दुखापत झाली आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळच्या शासकीय रूग्णालय दाखल करण्यात आले असून तिघांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टराकडुन सांगण्यात आले आहे

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

MPSC आंदोलन: विद्यार्थ्यांकडे समाजकंटक म्हणून पाहू नये; पारदर्शक परीक्षा घेणे हे सरकारचे कर्तव्य - मुंबई उच्च न्यायालय

'तिरंग्याला समर्पित जीवन': नाना पाटेकर यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी भावूक

LIVE: तिरंग्याला समर्पित जीवन': नाना पाटेकर यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी भावूक

शेअर बाजारात भरघोस परताव्याचे आमिष दाखवून निवृत्त अधिकाऱ्याची ५.१० कोटी रुपयांना फसवणूक

खऱ्या आयुष्यातही हिरो होते नाना पाटेकर; कारगिल युद्धादरम्यान सैनिकांसोबत ६० दिवस घालवले, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर

पुढील लेख
Show comments