शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (20:31 IST)

डिजीधन योजनेच्या भाग्यवान विजेत्यांची नावे जाहीर

डिजीधन योजनेअंतर्गत डिजीटल व्यवहार करणाऱ्या भाग्यवान विजेत्यांची नावे  जाहीर करण्यात आली. या भाग्यवान विजेत्यांमध्ये लातूरची श्रद्धा मेंगशेट्टे ही तरुणी 1 कोटी रुपयांच्या बक्षीसाची मानकरी ठरली. श्रद्धाने केवळ 1490 रुपयांचा डिजीटल व्यवहार केला होता. मात्र डिजीधन योजनेअंतर्गत ती भाग्यवान ठरली. तर चिमन भाई प्रजापती ( गुजरात ) यांना 50 लाखाचे दुसरे आणि केवळ शंभर रुपयांचे डिजीटल पेमेंट करणारे भरत सिंह (देहरादून) यांना 25 लाख रुपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.