सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मे 2017 (20:45 IST)

अखेर डॉक्टरांचा संप तूर्त तरी स्थगित

मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा डॉक्टर संघटनेने संपूर्ण जिल्ह्यात काम बंद आदोलन पुकारले होते. त्यामुळे सर्व डॉक्टर संपावर गेले होते. मात्र संशयित मारेकरी यांना पोलिसांनी केलेली अटक आणि पालकमंत्री यांनी दिलेल्या सुरक्षेच्या आश्वासनांची अंमलबजवणी यावर संप तूर्तास स्थगित केल्याची घोषण संघटनेने केली आहे. मात्र याआधी सकाळी बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय झाली.