Festival Posters
✕

Dombivali : रील बनवताना विहिरीत पडून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Updated: बुधवार, 14 जून 2023 (15:45 IST)
 
डोंबिवलीच्या जवळ ठाकुर्ली येथे पंप हाऊसच्या खोल विहिरी जवळ एक तरुण रील बनवताना विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला आहे. बिलाल सोहिल शेख असे या मयत तरुणाचे नाव आहे. 
 
ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. मुंब्रा येथे राहणारा मयत बिलाल सोहिल शेख आपल्या दोन मित्रांसह ठाकुर्लीच्या पंप हाऊस येथे रील बनवायला गेला. रील बनवताना त्याचा तोल गेला आणि तो खोल विहिरीत पडला.त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली पण आजूबाजूला कोणीच नसल्याने वेळीच मदत मिळू शकली नाही आणि तरुणाचा बुडून मृत्यू झाला.  त्याच्या मित्रांनी ही घटना विष्णूनगर पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचून बिलालचा शोध घेणे सुरु केले. 32 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलांच्या जवानांनी बिलाचा मृतदेह शोधून काढला.मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit  
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवी मुंबईत तेलाच्या गोदामाला भीषण आग; सुदैवाने सुट्टीमुळे कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती

LIVE: महाराष्ट्रात आज रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेविरोधात ऑटो-रिक्षा चालकांचा संप

कोटा-उदयपूर महामार्गावर भीषण अपघातात धुळे जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील नऊ सदस्यांचा मृत्यू

तामिळनाडूमध्ये भीषण कार अपघातात 8 जणांचा मृत्यू

नायजेरियामध्ये मोठा अपघात! अंत्यविधीसाठी लोकांना घेऊन जाणारी बोट उलटली; २४ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments