1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 जानेवारी 2023 (16:37 IST)

वसईत ट्रेन आली तरी फाटक उघडेच

दिवा-वसई मार्गावर डोंबिवलीतील मोठागाव येथे रात्रीच्या वेळी रेल्वे फाटकची उघडझाप करणाऱ्या  गेटमॅन चक्क रेल्वेचे फाटक उघडे ठेवून झोपी गेला. ट्रेन आली तरीही फाटक उघडेच होते. हा धक्कादायक आणि गेटमॅन चा गैरजबाबदार प्रकार काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. 
 
ही घटना आहे डोंबिवलीतील मोठागाव इथली. डोंबिवली मोठागाव भागात नागरिकांची संन्ख्या जास्त असून नागरिकांना दिवा वसई मार्गावरील रेल्वे फाटकातून रात्री अपरात्री येजा करावे लागते. फाटक बंद करण्यासाठी 24 तास गेटमॅनची नेमणूक केली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास रेल्वेचे फाटक उघडे ठेवून गेटमॅन केबिनचे दार आतून बंद करून चक्क झोपी गेला. रात्रीच्या वेळी येजा करणाऱ्या नागरिकांना गाडीचा आवाज ऐकू आला पण रेल्वेचे फाटक त्यांना उघडे दिसले. नागरिकांनी गाडीचा हॉर्न ऐकून फाटक ओलांडणे थांबवले मात्र गाडीचा आवाज ऐकून देखील रेल्वेचे फाटक उघडेच असल्याचे पाहून काही नागरिकांनी केबिन कडे धाव घेतली आणि गेट मॅन ला केबिनचे दार लावून झोपलेले पहिले काहींनी संतापून हे प्रकार आपल्या मोबाईल मध्ये कैद केले. त्यांनी केबिनचे दार ठोठावून झोपलेल्या गेटमॅन ला जाग करून गाडी येण्याचे सांगितले. गेटमॅन ने तातडीने फाटक बंद केले.आणि रेल्वेला मार्ग मोकळा करून दिला. मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
Edited By - Priya Dixit