Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ देऊ नका : मुख्यमंत्री

Updated: सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (15:45 IST)
 
कोरोनाशी दोन हात करत असताना सर्वांनी काळजी घ्यायचीच आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. 'कोरोना अजून आपल्यातून गेलेला नाही. जगात काही देशांत, तर याची दुसरी लाट आली आहे त्यामुळं आपल्याला सावधपणे पुढं जावं लागत आहे', असं म्हणत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 
 
शासनाची जनतेप्रती असणारी जबाबदारी अधोरेखित करत जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे, लोकल आणि जीमसंदर्भातील निर्णय आपण अजून घेतलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात कोरोनाचा संसर्ग असतानाही टप्प्याटप्प्यानं अनलॉक करत अनेक सुविधा आणि सेवा पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली गेली. पण, अनेक ठिकाणी असं होत असतानाच कोरोनाचा मात्र विसर पडल्याचं भीषण चित्र पाहायला मिळालं. परिणामी काही अंशी नियंत्रणात असणारी परिस्थिती पुन्हा चिंतेत टाकणाऱ्या वळणावर आली. 
राज्यातील अशाच परिस्थितीवर भर देत आणि संकट टळलेलं नाही, हेच पुन्हा सांगत सुरु केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनी जनतेला लॉकडाऊन लावण्याची वेळ पुन्हा येऊ देऊ नका, शिस्त पाळा, आरोग्य सांभाळा असं आवाहनही केलं.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

₹300 मध्ये वर्षभरासाठी रिचार्ज करण्याचा त्रास आता संपला! 20 ऑगस्टपासून सबस्क्रिप्शन उपलब्ध; ₹299 चा प्लॅन सुरूच

LIVE: गिरीश महाजन यांची नाशिकचे तर भरत गोगावले यांची रायगडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती

अमरावतीत दोन मोटरसायकलची भीषण टक्कर; लहान बाळासह दोघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

पालकमंत्री पदाचा वाद अखेर मिटला, गिरीश महाजन यांची नाशिकचे पालकमंत्री तर भरत गोगावले यांची रायगडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती

नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत पडून सख्ख्या दोन बहिणींचा मृत्यू

पुढील लेख