शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (15:45 IST)

कंगनावर बोलू नका, मातोश्रीवरून देण्यात आले सक्त आदेश

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते कंगनाच्या विरुद्ध आक्रमक होत असताना आता मात्र कंगनावर न बोलण्याचे आदेश मातोश्रीने नेत्यांना दिले आहेत. याबाबत मातोश्रीवरुन पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना सक्त आदेश आले आहेत. कंगनाच्या कार्यालयाच्या पाडकामावर न बोलण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुंबई मनपाची कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा भाजपने आरोप केला आहे. कंगना प्रकरणावर मात्र शिवसेनेचे मौन धरलं आहे.
 
शिवसेना आणि कंगना यांच्यातील वाद आता आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. कंगनाने मुंबईचे पीओके असे वर्णन केले होते. त्यानंतर, शिवसेना आणि कंगनामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. कंगनाला मात्र शिवसेनेची पंगा घेणं महागात पडलं आहे. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे.