Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांना विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड

Updated: सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (15:44 IST)
 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई)ने नीट परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ड्रेसकोड निश्चित केलेला आहे. त्याचे पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही. हीच पध्दत आता आरोग्य विज्ञान विद्यापीठाने स्वीकारली आहे. विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या एमबीबीएस, बीडीएस यांसह विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आला आहे. राज्यात पहिल्यांदाच एखाद्या विद्यापीठाने अशाप्रकारे ड्रेसकोड ठरविला आहे.
 
असा असेल ड्रेसकोड
- अर्ध्या बाहीचे, फिक्या रंगाचे शर्ट किंवा टी-शर्ट आणि फुल पॅन्ट. मुलींना यासह साडी किंवा सलवार कमीजही चालेल.
- शर्टला छोटे बटन असावे. नक्षीदार बटन नसावे. 
- अंगठी, गळ्यातील साखळी यांसह कुठल्याही प्रकारचे दागिने (मंगळसुत्र वगळून) घातला येणार नाही. 
- घड्याळ, मोबाईल किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नसावे.
- अप्रन, टोपी, गॉगल, पर्स, हार, चेन, पीन, हँड बॅग आदी वस्तु वापरता येणार नाहीत.
- पायात चप्पल/स्लीपर असावी. बुट नसावेत.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: वैशाली दरेकर यांचा उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा

सिद्धिविनायक मंदिरात १८ कोटी रुपयांची मोठी चोरी उघडकीस, ४६ कर्मचारी निलंबित , ९ जणांना अटक

कुर्ल्यातून अपहरण झालेला ६ महिन्यांचा मुलगा ४ तासांत सापडला, आरोपीला अटक

विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना काँग्रेस मध्ये येण्याचे ऑफर दिले

रिलायन्स फाऊंडेशनकडून आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २१ कोटी रुपयांची देणगी

पुढील लेख
Show comments