गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (07:59 IST)

तळीरामांनो लक्ष द्या आता मद्याचे दर तीस रुपयांनी वाढले

2018-2019 या आर्थिक वर्षासाठीची उत्पादन शुल्कातील तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य सराकराने विदेशी दारुवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विदेशी दारूची किंमत प्रती लिटरमागे तब्बल वीस ते तीस रुपयांनी वाढणार आहे. याआगोदर सरकारने २०१३ मध्ये विदेशी दारुवरील उत्पादन शुल्कात वाढवले होते. एका इंग्रजी वर्तमानपत्राला अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विदेशी दारुवरील उत्पादन शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव उत्पादन शुल्क मंत्र्य़ांसमोर ठेवला आहे. या विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेशावर सही  होताच निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता ते त्या प्रस्तावाला मंजुरी मिळणं औपचारिकता असून या वाढीमुळे राज्य सरकारला जवळपास ७०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पादन शुल्क मिळणार आहे.’