गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2017 (13:55 IST)

पुणे : डी एस के विरोधात हजारो गुंतवणूकदारांनी अखेर तक्रार

पुणे येथील प्रसिद्ध उद्योपती असलेले  डी. एस. कुलकर्णीं विरोधात अखेर  तक्रार दाखल  करण्यासाठी त्यांचे फसवणूक झालले  हजारो गुंतवणूकदार  आर्थिक गुन्हे शाखेमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये पहिला गुन्हा हा 28 ऑक्टोबरलाच दाखल करण्यात आला आहे. मात्र पैसे मिळत नसल्याने आता गुंतवणूकदार तक्रार करण्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे डी एस के यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यामध्ये  आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत टेबल – खुर्च्या टाकून तक्रारी नोंद करुन घेण्यात आल्या आहेत.  पोलिसांच्या मते, डीएसकेंकडे विविध योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या 33 हजारांहून अधिक अशी आहे. तक्रारदार पाहिले असता अनेक  जेष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. डीएसकेंकडे पैसे गुंतवणारे लोक पैसे परत मिळावेत यासाठी कार्यालयाबाहेर रोज पैसे मागत होते. मात्र त्यांना यश मिळत नव्हते त्यामुळे नागरिक आता संतापले आहे. त्यामुळे पैसे सहज मिळणार नाही हे पाहता  28 ऑक्टोबरला डीएसकेंविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तर आज हजारो गुंतवणूकदार पुणे आर्थिक शाखेत आले आहेत.