Daily Horoscope

या कारणामुळे उद्धव ठाकरेंनी सोडलं पद

Updated: रविवार, 1 मार्च 2020 (12:25 IST)
 
सामनाची सुरुवात झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे संपादकपदी होते. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक राहिले. पण आता मुख्यमंत्री झाल्यामुळे लाभाच्या पदावरून अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हे संपादकपद रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं आहे. आजच्या सामनामध्ये संपादक सौ रश्मी ठाकरे असा उल्लेखदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे त्या सामनाचं कामकाज कसं पाहतात हे बघणं महत्त्वाचं आहे.
 
लाभाच्या पदावरून शंका उपस्थित होत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संपादकपद सोडलं. खरंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून रश्मी ठाकरे या राजकारणात  एक्टिव्ह दिसल्या. त्यामुळे त्या राजकारणात येणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. रश्मी ठाकरेंनी महिला आघाडीचं काम पाहिलं आहे पण त्या कधीच कोणत्याही पदावर नव्हत्या. पण आता त्यांना सामनाचं संपादकपद देण्यात आलं आहे. तर कार्यकारी संपादक म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत काम पाहतात.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

पुणे-बंगळूरू महामार्गावर ट्रकने टेम्पो आणि दोन कारला धडक दिल्याने भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर १२ जण जखमी

जालनामध्ये ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; ६० वर्षीय आरोपीला अटक

इस्तंबूलहून इंडोनेशियाला गंभीर रुग्णाला घेऊन जाणारी एअर अॅम्ब्युलचे नागपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग

LIVE: पुढील वर्षी एमपीएससी परीक्षा ऑनलाइन होणार नाही

मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली

पुढील लेख
Show comments