Daily Horoscope
✕

महाराष्ट्र दिनापासून ई-शिवनेरी धावणार

Updated: शनिवार, 22 एप्रिल 2023 (09:29 IST)
 
दरम्यान इलेक्ट्रिक शिवनेरी बसमध्ये संपूर्ण वातानुकूलित, मोबाईल चार्जिंगसह अत्याधुनिक इन्फोटेन्मेंटची सुविधा मिळणार आहे. तर एकदा बॅटरी चार्ज झाल्यानंतर 400 किमीचा टप्पा पार करण्याची क्षमता या बसमध्ये आहे. सध्याच्या शिवनेरीच्या तिकीट दराच्या तुलनेत या गाड्यांचे भाडे कमी असणार आहे. ठाणे-पुणे महामार्गावर धावणाऱ्या बसचे भाडे 350 रुपये असण्याची शक्यता आहे.
 
तर डिझेल बसच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रिक बस चालवण्याचा खर्च कमी आहे. सध्या भारतामध्ये ‘फेम’ योजने अंतर्गत राज्य परिवहन महामंडळामध्ये काही बस दाखल करुन घेण्यात आल्या आहेत. शिवनेरी ही एसटी महामंडळाच्या ताफ्यातील प्रीमियम बस सेवांपैकी एक आहे. व्होल्वो श्रेणीतील ही बस आरामदायी आणि वेगवान असल्याने अनेक जण त्याला प्राधान्य देतात. वरचे वर मुंबई पुणे प्रवास करणारे अनेक जण नियमित शिवनेरीने फिरतात. त्यामुळे हा प्रवासी कायम राहण्यासाठी ई-बसचे नामकरण ई-शिवनेरी करण्यात आले आहे.
 
काय आहे ई-शिवनेरीची वैशिष्ट्ये?
ई शिवनेरी बसची क्षमता 43 प्रवाशांची
एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 400 किमीचा टप्पा पार करण्याची क्षमात
ई शिवनेरी संपूर्ण वातानुकुलित बस
आरामदायी आसन व्यवस्था
मोबाईल चर्जिंगची सोय
बॅग ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठल्यामुळे येत्या काळात या इलेक्ट्रिक बसचा सर्वसाधारण नागरिकांना फायदा होणार आहे. शिवाय तिकीटांच्या दरात देखील तफावत जाणवण्याची शक्यता आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments