मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 1 मे 2022 (13:46 IST)

राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Maharashtra Song
महाराष्ट्र दिन यंदा राज्यात उत्साहात साजरा केला जात आहे. कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे लावण्यात आलेले निर्बंध काढल्यामुळे यंदा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र दिना निमित्त मुंबई महानगर पालिका, छत्रपती शिवाजी टर्मिनल्स आणि मंत्रालयाला विद्युत रोषणाईने सजविले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे होणाऱ्या ध्वजवंदन समारोह साठी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही आणि हे करतांना महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकाविल्याशिवाय राहणार नाही  मनात कोणताही द्वेष न ठेवता महाराष्ट्र्राचा डंका देशातच नव्हे तर जगात वाजला पाहिजे.या साठी आपण एकत्र यायला पाहिजे. असे ते म्हणाले.
 
गेले दोन वर्ष कोरोनाच्या सावट मुळे आव्हाहनाची परिस्थिती होती. अशा परिस्थितीत शेती, उद्योग क्षेत्रात देखील महाराष्टाने स्वतःला आघाडीवर ठेवले. शिवभोजन  थाळी मोफत भोजन देऊन आर्थिक व दुर्बळ घटकांना आर्थिक साहाय्य करून महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवली. आरोग्य, नागरी विकास आणि पर्यावरण साठी घेतल्या जाणाऱ्या पावलांसाठी देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर कौतुक झाले. कोणतेही संकट येवो. मग ते नैसर्गिक असो किंवा विषाणूजन्य प्रशासनाने हिमतीने आणि धीराने काम केले.
 
 
राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साहमहाराष्ट्र दिनानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौकात पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. आज महाराष्ट्र दिनी काही लोक इथे येऊन राजकीय वक्तव्य करतातआपण सर्वजण महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी येथे आलो आहोत .कोरोनाच्या संकटानंतर यंदा प्रथमच 'महाराष्ट्र दिन' राज्यभरात मोठ्या उत्साहात संपन्न होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात या मोठ्या उत्साहात कामगार दिन साजरा केला जात आहे. मुंबई येथे भाजप नेते देवेंद्र फडणवीस याच्या उपस्थितीत भाजपा आमदार, खासदार व कार्यकर्त्यांनी श्रद्धा सुमन अर्पित केले.