शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 1 मे 2022 (10:59 IST)

एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी यांच्या संजय राऊतांवर घणाघात

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे. ठाकरे कुटुंबातील भांडणात माझे नाव आणू नये, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
 
असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, संजय राऊत यांनी मला त्यांच्या भांडणात ओढू नये. राज ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनी माझे नाव 'हिंदू ओवेसी' घेऊ नये. हा ठाकरे कुटुंबातील प्रश्न आहे. त्यांनी ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 
काय म्हणाले संजय राऊत 
याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना 'हिंदू ओवेसी' म्हटले होते. भारतीय जनता पक्ष मुस्लिम मतांच्या विभाजनासाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा वापर करते आणि आता काही 'हिंदू ओवेसींना 'शिवसेनेच्या हिंदुत्वावर हल्ला चढवायला लावला' असा दावा संजय राऊत यांनी केला होता.