मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 8 डिसेंबर 2017 (11:02 IST)

एक्स्प्रेस वेवरील गाडी चालवताना आता स्पीड लिमिट

होय आता नव्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर स्पीड लिमिट करण्यात येणार आहे. यामध्ये राज्य पोलिसांनी मार्गावरील तीन टोल नाक्यांवर ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन’ असलेले २६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे बेलगाम  चालकांना आळा बसवताना ह्येणार असून त्यामुळे होणारे भीषण  अपघात कमी करता येणार आहेत.   यासाठी महामार्ग पोलिसांनी एक्स्प्रेस वेवर अदृश्य पोलीस पथकही नेमले आहेत. या पथकाकडून निष्काळजीपणे धावणाऱ्या वाहनाचा क्रमांक टोल नाक्यांवरील कर्मचाऱ्यांना पाठवला जाणार आहे.  त्यामुळे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून  कॅमेऱ्यांसाठी असलेल्या स्वतंत्र यंत्रणेत वाहन क्रमांक नमूद करतील आणि  टोल नाक्यावर नियम तोडणारे वाहन येताच  नंबर प्लेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येईल व अलर्ट देणारा अलार्म वाजणार आहे. त्यामुळे अशा वाहनचालकांवर जलद गतीने कारवाई पोलीस करणार आहेत.