1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (17:03 IST)

88 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

thali
अहमदनगर- अमरावतीहून शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची बातमी आहे. रात्रीच्या जेवणानंतर अचानक उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपास 88 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.
 
विद्यार्थ्यांवर शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अमरावतीतील दर्यापूर तालुक्याच्या आदर्श हायस्कूलची शिर्डीला सहल आली असता इयत्ता चौथी ते सहावीचे एकूण 230 विद्यार्थी यात सामील होते.
 
माहितीनुसार या विद्यार्थ्यांची शाळेने नेवासा येथे थांबण्याची व्यवस्था केली होती. सहलीच्या ठिकाणी जेवण केल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपास 88 विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळचा त्रास होऊ लागला होता. दरम्यान सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.