रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (18:56 IST)

महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेसचं जल्लोषात स्वागत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या दोन वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन झालं. मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा दोन मार्गांवर या वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत.
'वंदे भारत' एक्सप्रेसच्या वेगामुळे हा प्रवास नेहमीपेक्षा एक ते दोन तासांनी कमी होणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्या नंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सोलापूर आणि शिर्डी येथे जाण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस रवाना केल्या. शिर्डीला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ठाणे स्थानकात थांबली या वेळी वंदे भारत एक्स्प्रेसचे ढोल ताशांचा गजरात जल्लोषात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस शिर्डी रेल्वे स्थानकात दाखल झाल्यावर साई संस्थानच्या वतीने वंदे भारत एक्स्प्रेसची पूजा करून वंदे भारत एक्स्प्रेसचे जल्लोषात ढोल ताशांचा गजरात स्वागत करण्यात आले. 
 
वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्ये
* वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 16 वातानुकूलित डबे असतात. त्यापैकी 2 एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे आहेत. प्रत्येक डब्याची एकूण आसन क्षमता 1,128 प्रवासी इतकी आहे.
* डब्यांच्या खालील रचना बदलण्यात आल्याने पारंपारिक डब्यांपेक्षा सामान ठेवण्यासाठी जास्त जागा उपलब्ध होते.
* सर्व डब्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे लावलेले असतात. त्याचं नियंत्रण रेल्वे चालकांकडे असतं.
* प्रत्येक डब्यात प्रवाशांना आवश्यक ती माहिती देण्यासाठी संपर्क यंत्रणा (GPS आधारित ऑडिओ-व्हिज्युअल पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम) लावण्यात आलेली असून त्यामध्ये 32 इंची एलसीडी टीव्हीसुद्धा समाविष्ट आहे.
मनोरंजनाच्या उद्देशाने ऑन-बोर्ड हॉटस्पॉट वाय-फाय आणि अतिशय आरामदायक आसनव्यवस्था. बाहेरील उष्णता आणि आवाज नियंत्रित ठेवम्यासाठी इन्सुलेशन.
* प्रकाशयोजना संयुक्त आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध. इलेक्ट्रिक बिघाड झाल्यास ट्रेनच्या प्रत्येक डब्यात चार आपत्कालीन दिव्यांची सोय.
* गरम जेवण, गरम आणि थंड पेयपदार्थ देण्यासाठी पॅन्ट्री कारची सोय.
* बायो-व्हॅक्यूम प्रकारातील शौचालयांची प्रत्येक डब्यात सुविधा.
 
या गाड्यांमुळे शिर्डीच्या साईबाबांचं, तुळजापूरच्या भवानीचं आणि पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन करणं सोपं होणार आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.
Edited By - Priya Dixit