रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (16:33 IST)

पोलिसांच्या वेशात येत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र तुपकर यांनी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी टोकाची भूमिका घेत ते आत्मदहन करतील असा  इशारा दिला होता. त्यांनी मागण्या पूर्ण करा नाही तर आत्मदहन करू द्या. असे  म्हटले होते. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली. त्यांनतर ते भूमिगत झाले. ते आत्मदहन कुठे करणार हे कोणालाच माहीत न्हवते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र तुपकर हे पोलिसांच्या वेशात बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि त्यांनी जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या  समोर  स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.    
 
Edited By - Priya Dixit