सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

ठाणे: चोराने गिळली सोन्याची चेन, पोलिसाने करवली पॉटी

ठाण्यात मागील आठवड्यात पोलिस एका चोराची पॉटी चेक करत राहिली. पोलिस कस्टडीत चोराला पॉटेशियमयुक्त आहार दिला जात होता कारण की त्याला पॉटी लागावी आणि पोलिसांना पुरावा मिळावा. या चोराने चेन स्नॅचिंग करून आपला गुन्हा लपवण्यासाठी सोन्याची चेन गिळून घेतली होती.
 
अटक केलेल्या चोराचे नाव सादिक शेख असून त्याला 15 डिसेंबर रोजी धरले होते. पोलिसांप्रमाणे शेख आतापर्यंत अनेकदा चेन स्नॅचिंग करून चुकला आहे. 15 डिसेंबर रोज शेखला तेजस पाटिला नावाच्या इसमाने चेन चोरताना पकडले होते आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी शेखने ‍ती चेन गिळून घेतली.
चेन गिळल्यावर पोलिस अधिकार्‍याने त्याचे एक्स रे करवले ज्यात चेन आतडीत फसलेली दिसत होती. नंतर पॉटीद्वारे ती चेन बाहेर पडावी म्हणून शेखला केळी खायला दिली, औषधं दिली गेली. पुराव्यासाठी दोन दिवसात शेखला 8 वेळा पॉटी करवण्यात आली परंतू चेन काही बाहेर निघाली नाही.
 
शेवटी शनिवारी पोलिस त्याला जेजे हॉस्पिटल घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याला एनीमा दिला आणि पोलिसांना चोरीचा पुरावा सापडला. पोटातून बाहेर पडलेली चेन कोर्टात जमा करवण्यात आली असून पोलिस शेखकडून दुसर्‍या प्रकरणांतील पुरावे एकत्र करत आहे. 
 
तसेच तेजस पाटिल चेनबद्दल म्हणाले की, हे माहीत पडल्यावर की चेन कशी बाहेर पडली, बहुतेकच ही पुन्हा गळ्यात घालू शकेन.