1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (09:18 IST)

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

rain
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या मेघसरी बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

राज्यात किमान तापमानात वाढ झाली असून दुपारी उकाडा जाणवतो. पुण्यात दुपारी उष्ण हवामान असतो. येत्या 48 तासांत आकाश निरभ्र राहील धुके पडण्याची शक्यता आहे. 23 नोव्हेंबर नंतर वातावरण ढगाळ होईल. 24,25,26 रोजी हलक्या मेघसारी बरसणार असून हलका ते मध्यम पाऊस बरसणार .27 नोव्हेंबर नंतर किमान तापमानात घट होईल. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे किमान तापमानात घट होणार. 

राज्यातील अनेक भागात ढगाळी  वातावरण आहे. गुरुवारी राज्यातील कोकणात सिंधुदुर्ग, मध्यमहाराष्ट्र कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit