1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (08:40 IST)

शरद पवारही मला स्क्रीप्ट देऊ शकत नाहीत

chagan bhujbal
जरांगेंच्या सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाला भुजबळांचा विरोध आहे. यावरून रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती. भुजबळांना स्क्रीप्ट कोण देतंय ते पहावे लागेल असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाला आता भुजबळांनी उत्तर दिले आहे.
 
‘मी महाराष्ट्रात सगळीकडं एकटा जाऊ शकत नाही. पण इतर जे ओबीसी नेते आहेत त्यांनी कुठल्याही पक्षात असलं तरी ओबीसी आरक्षण बचावसाठी काम करत राहावं. हे आंदोलन राज्यभर चालू ठेवा. आमची मोट सुटलेली नाही.
 
अडचणी काहीही असू शकतात त्यामुळे काही नेते जातील-येतील, मला याबद्दल रोष नाही. कुठल्याही पक्षात राहा पण ओबीसींसाठी लढा. माझ्या विरोधात लढलात तरी ओबीसींसाठी बोला,’ असे आवाहन भुजबळांनी केले आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor