Festival Posters
✕

विवाहितेचा छळ करून तिचा खून !

Updated: गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (21:39 IST)
योगिता नीलेश दळवी (वय 22 रा. अरणगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यातखूनाचा गुन्हा दाखल केला आहे. मयत योगिताचे वडिल देवराम आसाराम गव्हाणे (वय 52 रा. वडगाव गुप्ता ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
योगिताचा पती नीलेश बाळासाहेब दळवी, सासू आशा बाळासाहेब दळवी, सासरा बाळासाहेब रामभाऊ दळवी, भाया पप्पु बाळासाहेब दळवी, जाव मेघा पप्पु दळवी (सर्व रा. अरणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. गव्हाणे यांच्या मुलीचे नीलेश दळवी याच्यासोबत लग्न झाले होते.
लग्नावेळी सासरच्यांनी पाच लाख रूपये हुंडा मागितला होता. हुंडा दिला नाही, म्हणून सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता. योगिताने फोन करून माहेरच्या लोकांना हा प्रकार सांगितला होता. योगिता तिच्या घरी असताना आरोपींनी तिला गळफास देवुन जीवे ठार मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान योगिताला नगरमधील रूग्णालयात आणल्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांनी तेथे गर्दी केली होती. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
घटनास्थळी कोतवाली पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दुसर्‍या दिवशी योगिताच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments