1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 16 जानेवारी 2021 (15:40 IST)

धनंजय मुंडे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पोलिसांना महत्वाचे आदेश

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला. आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाबाबत पोलिसांना महत्वाचे आदेश दिले आहेत. 
 
धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार आरोपांबाबतचा तपास आठवड्याच्या कालावधीत पूर्ण करा, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत. एसीपी ज्योत्स्ना रासम यांनी या संदर्भात तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवला आहे.