गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (16:43 IST)

आता गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का?, अनिल देशमुख यांचा सवाल

“बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र आणि मुंबईची बदनामी केली. ते आता बिहारमधून निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या प्रचाराला जाणार का?,” असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला आहे.
 
सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केलं. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी  केली आहे. बदनामी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असंही ते म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
“एम्सचा रिपोर्ट जाहीर झाला आहे. कूपर आणि एम्सचा रिपोर्ट पाहिला तर त्यात कुठेही व्हिसेरामध्ये विषाचा अंश सापडला नाही. या संपूर्ण केसची चौकशी सीबीआयच्या माध्यमातू सुरु आहे. सीबीआयचा अंतिम रिपोर्ट येईल तेव्हा त्यात काय असेल याची सर्वजण वाट पाहत आहेत. लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर करावा अशी आमची विनंती आहे. यामुळे सुशांतची हत्या होती की आत्महत्या हेदेखील स्पष्ट होईल,” असं यावेळी अनिल देशमुख यांनी म्हटलं.