बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जानेवारी 2021 (08:14 IST)

माझी सुरक्षा कमी करा, शरद पवार यांची अनिल देशमुख यांच्याकडे मागणी

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा कमी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून आपली सुरक्षा कमी करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर या भाजप नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सुरक्षेत घट केली आहे. 
 
सुरक्षेत घट केल्यानंतर शरद पवार म्हणाले, 'माझी सुरक्षा कमी करा. मी स्वतः माझी सुरक्षा कमी करण्यास तयार आहे. शिवाय मला देण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या.' असं पवारांनी अनिल देखमुख यांना फोनच्या माध्यमातून सांगितलं आहे.