शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 9 जानेवारी 2021 (17:24 IST)

हिवाळ्यात वजन कमी करण्यासह पोटाची चरबी कमी करतात हे व्यायाम

हिवाळ्यात वजन वाढण्याचे अनेक कारणं होऊ शकतात. या हंगामात थंडीमुळे भूकच जास्त लागत नाही तर या हंगामात चहा भजे वारंवार खाल्ल्यानं पोटाची चरबी देखील वाढते. अशा परिस्थितीत आपल्याला काही व्यायाम करण्याची गरज आहे ज्यामुळे आपले वजन नियंत्रित करण्यासह आपली पोटातील चरबी देखील कमी होईल.चला तर मग जाणून घेऊ या काही वर्क आउट्स टिप्स जे आपल्या फॅट ला त्वरितच बर्न करेल.
 
* माउंटन क्लाइंबर -
पोटाची चरबी कमी करण्यासह गतिशीलता सुधारण्यास, कॅलरी बर्न करण्यास आणि बाहेरचे स्नायू सक्रिय करण्यात मदत करतो. हे व्यायाम केल्यानं संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
* हे करण्यासाठी गुडघ्यावर बसा आणि दोन्ही हात समोर घेऊन जमिनीवर ठेवा.
* दोन्ही पाय मागे घेऊन सरळ करा.
* दोन्ही हात आणि दोन्ही पायांमध्ये खांद्यांच्या प्रमाणे अंतर ठेवा.
* उजवा पायाचा गुडघा दुमडून गुडघ्याला छातीजवळ आणा.
* उजवा पायाचा गुडघा खाली करून पायाला सरळ करा. 
* उजवा पायाला सरळ करा आणि डाव्या पायाच्या गुडघ्याला छातीकडे आणा.
* कुल्हे सरळ ठेवून गुडघे आत बाहेर करा (शक्य तितके).
* ह्या दरम्यान पायाच्या क्रियेसह श्वास घ्या आणि सोडा.
* या व्यायामाला किमान 15 वेळा करा. 

2 सायकलिंग -
हा व्यायाम कुल्ह्याच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी, पोटाच्या स्नायूंना सक्रिय करण्यासाठी आणि मांड्यांना टोन करण्यासाठी मदत करतात.
* हे करण्यासाठी मॅटवर झोपा आणि हातांना बाजूला किंवा डोक्याच्या मागे ठेवा.
* दोन्ही पाय उचला आणि गुडघ्यावर वाका.
* डाव्या पायाला लांब करून उजव्या गुडघ्याला छातीच्या जवळ आणा.
* उजव्या पायाला लांब करून डाव्या पायाला छातीच्या जवळ आणा.
* नंतर आपण सायकल चालवत आहात असं करा.
* असं किमान 15 वेळा करा.