गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (09:29 IST)

काय सांगता, व्हिटॅमिन सी चे जास्त सेवन देखील हानिकारक आहे

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोक व्हिटॅमिन सी चे सेवन करत आहे. व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने प्रतिकारक शक्ती बळकट होते, परंतु  जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी घेणं देखील शरीरासाठी हानिकारक आहे. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्हिटॅमिन सी च्या वस्तूंचे सेवन मर्यादितच करावं. आज आम्ही सांगत आहोत, ह्याच्या जास्त सेवन केल्याने होणाऱ्या नुकसानाबद्दल. 
 
* शरीरात आयरन चे प्रमाण वाढतात -
व्हिटॅमिन सी चे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात आयरन ची मात्रा वाढते. ज्यामुळे शरीरात बरेच आजार उद्भवू शकतात.
 
* किडनीसाठी हानिकारक -
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेल्या वस्तूं चे सेवन केल्याने किडनीशी निगडित समस्यांचा धोका वाढतो. किडनीला निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी ने समृद्ध वस्तूंचे सेवन प्रमाणात करावं.
 
* पोटाचे त्रास उद्भवतात -
व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने पोटाशी निगडित समस्या होण्याचा धोका संभवतो. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्हिटॅमिन सी ने समृद्ध गोष्टींचा सेवन मर्यादित करावं.
 
* निद्रानाश होऊ शकतो-
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी चा सेवन केल्याने निद्रानाश ची समस्या होऊ शकते. म्हणून व्हिटॅमिन सी कमी प्रमाणातच घ्यावं.
 
* डोकेदुखीचा त्रास संभवतो -
व्हिटॅमिन सी डोकेदुखीच्या समस्येला कारणीभूत असू शकतो. त्या साठी व्हिटॅमिन सी ने समृद्ध वस्तूंचे सेवन कमी प्रमाणात करावं.