बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जानेवारी 2021 (10:37 IST)

Benefits Of Walking : चालण्याची पद्धत कशी हवी जाणून घ्या

आपण बऱ्याच वेळा आरोग्य तज्ज्ञांना सल्ला देताना ऐकलेच असेल की संपूर्ण दिवसात फक्त 30 मिनिटे वॉक केल्याने हृदय निरोगी राहण्यासह स्नायू बळकट करण्यासह हृदयरोग टाईप 2 मधुमेह, ऑस्टिओपोरोसिस आणि अनेक प्रकाराचे कर्करोगाच्या धोक्याला कमी करण्याचे काम करते. परंतु आपणास हे माहित आहे की निरोगी राहण्यासाठी वॉकिंग करण्याची योग्य पद्धत काय आहे आणि कोणत्या व्यक्तीने वॉक कसे करावे जाणून घेऊ या.
 
* वॉक कसे करावे जाणून घ्या - 
मुलांपासून वयोवृद्ध लोकांच्या उभारण्याच्या पद्धती पासून त्यांचा वॉक करण्याच्या पद्धतीमध्ये बरेच बदल दिसतात. पण त्याची योग्य पद्धत काय आहे जाणून घेऊ या.
* उभे राहण्याची पद्धत -
वॉक करताना एखाद्याला आपल्या उभ्या राहण्याच्या स्थितीकडे देखील लक्ष द्यायला हवे. वाकून उभे राहण्याने माणसाच्या पाठीचे त्रास वाढतात. उभारताना शक्य असल्यास ताठ उभे राहण्याचा प्रयत्न करा.
* हाताची स्थिती -
वॉक करताना आपल्या हाताला मोकळे सोडा. हात बांधून चालण्याने वॉक चा फायदा घेऊ शकणार नाही आणि या मुळे खांद्याला देखील त्रास होऊ शकतो.
* ध्येय निश्चित करा -
प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना वॉक करण्यासाठी एक ध्येय निश्चित करावे. दररोज 25 ते 30 मिनिटे वॉक केल्याने व्यक्तीला निरोगी ठेवते. 
* कोणत्या वयात किती वॉक करणे योग्य आहे-
5 ते 18 वर्षे - 5 ते 18 वर्ष च्या वयोगटातील मुलांना 16 हजार पावले चालले पाहिजे. तर मुलींना 13 हजार पावले चालू शकतात. 
19 ते 40 वर्षे- 
19 ते 40 वर्षे वयोगटातील पुरुष आणि बायकांना एका दिवसात किमान 13 हजार पावले चालले पाहिजे.
40 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती -
जर 40 वर्षापेक्षा जास्तीच्या लोकांबद्दल बोलावं तर त्यांच्या साठी 12 हजार पावले आदर्श मानले आहेत.
50 वर्षाची व्यक्ती- 
जर आपले वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे तर दररोज 9 ते 10 हजार पावले चालावे. 
60 वर्षा पेक्षा जास्त- 
60 वर्षा पेक्षा जास्तचा लोकांना निरोगी राहण्यासाठी दररोज 7 ते 8 हजार पावले चालावे. परंतु हे लक्षात ठेवा की आपण तेवढेच चालावं जेवढे आपल्याला शक्य आहे आणि ज्यामुळे आपल्याला थकवा होऊ नये.