शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जानेवारी 2021 (14:26 IST)

हिवाळ्यातील टिप्स : कच्च्या हळदीचे 10 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

हिवाळ्यात लोक थंडी पासून बचाव करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय वापरतात, जेणे करून निरोगी आणि थंडी पासून वाचता येईल. तसेच आज आम्ही आपल्याला अशा गोष्टींबद्दल सांगत आहो जे हिवाळ्यासाठी फायदेशीर आहे, आणि ती आहे कच्ची हळद. हिवाळ्याच्या हंगामात हळदीची गाठ सर्वात जास्त फायदेशीर आहे आणि हे हळदीच्या गुणधर्माला वाढवतो. कच्च्या हळदीमध्ये हळद पावडरच्या तुलनेत जास्त गुणधर्म असतात. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की कच्च्या हळदीच्या वापराच्या दरम्यान निघणारा रंग हळदी पावडरच्या तुलनेत जास्त दाट आणि घट्ट आहे. कच्ची हळद, आल्या सारखी दिसते. हे ज्यूस मध्ये, दुधात उकळवून, तांदुळाच्या पदार्थात, लोणच्यात, चटणीत आणि सुपामध्ये मिसळून वापर केली जाते. चला हळदी चे 10 गुण जाणून घेऊ या.
 
1 कच्च्या हळदीमध्ये कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म आहे. ही विशेषतः पुरुषांमध्ये होणाऱ्या प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींना वाढण्यासह त्यांचा नायनाट देखील करतात. हे हानिकारक रेडिएशनचा संपर्कात आल्याने होणाऱ्या ट्यूमर पासून संरक्षण करते.
 
2 हळदी मध्ये सूज रोखण्याचे विशेष गुणधर्म आहे.ह्याचा वापर संधिवाताच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. हे शरीरातील नैसर्गिक पेशींना संपविणाऱ्या रॅडिकल्स चा नायनाट करतात आणि संधिवात ने होणाऱ्या सांध्यातील वेदनेमध्ये आराम देतात.
 
3 कच्च्या हळदीमध्ये इन्स्युलिन पातळी संतुलित ठेवण्याचे गुणधर्म आहे. अशा प्रकारे हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. इन्स्युलिनच्या व्यतिरिक्त हे ग्लूकोजला नियंत्रित करत ज्या मुळे मधुमेहाच्या दरम्यान देण्यात आलेल्या उपचाराचा प्रभाव वाढतो. परंतु आपण जे औषधे घेत आहात ते हाय डोझ चे असतील तर हळदीचा वापर करण्यापूर्वी चिकित्सकांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचे आहे. 
 
4 संशोधनाने सिद्ध झाले आहे की हळदीमध्ये लिपोपायलिसॅराइड नावाचा घटक असतो, जो शरीरात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. हळद शरीरातील बॅक्टेरियांच्या समस्येस प्रतिबंध करते. हळद बुरशीजन्य संक्रमणापासून शरीराचे रक्षण करते आणि शरीराला ताप येण्यापासून वाचवते.

5 हळदीचा सतत वापर केल्याने कोलेस्टरॉल सिरम ची पातळी शरीरात नियंत्रणात ठेवून हळदीला हृदयरोगापासून सुरक्षित ठेवते.
 
6 कच्च्या हळदीत अँटीबॅक्टेरियल आणि अँटिसेप्टिक गुणधर्म आढळतात. या मध्ये संसर्गाशी लढण्याचे गुणधर्म देखील आढळतात. या मध्ये सोरायसिस सारख्या त्वचेशी निगडित रोगाच्या बचावाचे गुणधर्म असतात. 
 
7 हळदीचा वापर त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यात खूप प्रभावी आहे. या मधील अँटिसेप्टिक गुणधर्मामुळे भारतीय संस्कृतीत लग्नाच्या पूर्वी संपूर्ण शरीरावर हळदीचे उटणे लावतात.
 
8 कच्च्या हळदीपासून बनलेला चहा अत्यंत फायदेशीर पेय आहे. या मुळे प्रतिकारक शक्ती वाढते. 
 
9 हळदीमध्ये वजन कमी करण्याचे गुणधर्म आढळतात. ह्याचा नियमितपणे वापर केल्याने वजन कमी होण्याची गती वाढते.
 
10 संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की हळद लिव्हरला निरोगी ठेवते. हळदीचा वापर केल्याने लिव्हर सहजतेने काम करतो. हळदी आश्चर्यकारक गुणधर्माने समृद्ध आहे परंतु काही लोकांवर ह्याचा विपरीत परिणाम होतो.ज्या लोकांना हळदीची ऍलर्जी आहे त्यांना पोटात वेदना किंवा अतिसार सारखे लक्षणे आढळतात. गरोदर बायकांनी कच्च्या हळदीच्या वापरण्यापूर्वी चिकित्सकांचा सल्ला घेणं महत्त्वाचे आहे. या मुळे रक्त गोठण्यावर परिणाम होऊ शकतो. रक्तप्रवाह वाढतो म्हणून एखाद्याची शस्त्र क्रिया  व्हायची असेल तर त्यांनी कच्च्या हळदीचे सेवन करू नये.